मकरसंक्रांतीला पतंग उडवणे

मकरसंक्रांतीला हिंगोलीत पतंग खूप मोठ्या प्रमाणात उडवतात. 

पूर्वी मी लहानपणी माझवेड पतंग उडवणे होते तस हिंगोली जिल्ह्यात मकरसंक्रांतिला पतंग उडवण्याचा नादच लय भारी आहे. एकवेळा येऊन बघू शकता थोडा माझा नात कमी झाला  पण एक दिवस संक्रातीलाच थोडा पतंग उडवतो कारण त्या दिवशी सर्व हिंगोलीतील मूल मोठे माणसं असो काही मुली असो ज्यांना आवड आहे तो नक्कीच गच्चीवर/छतावर/घरच्या पत्रावर / दिवसभर पतंग उडवत असतो.
दरवर्षी ची प्रथा आहे मी जास्त पतंग उडवत नाही आता पण लहान मुले पतंग जास्त उडवतात जस मी लहानपणी होतो तेच मला त्याचा मध्ये दिसतेस.
आपण पण हेच करत होतो त्यांना मी काही बोलू शकत नाही कारण मी पण तेच केलं होतं
पतंग उडवण्याचा छंद मला खूपच होता.
संक्रातीच्या पूर्वी २ महिन्याअगोदर पासून मी रोज पतंग उडवत होतो. दोन वेळा घरच्या गच्चीवरून/छतावरून खाली पडण्याचा मान मला मिळाला म्हणजे दुःख झाले एवढा नाद होता की खाली पण माझं लक्ष गेलं नाही. पण नशीब चांगलं २वेळा वाचलो. आम्ही स्वतः तेव्हा मांज्या तयार करत होतो कधी पैसे नसले तर फाटक्या पण्णी चा पतंग तयार करून उडवणे तुटकी मुटकी चक्री ला मांज्या गुंडाळणे पतंग तयार केला तर त्याला कणा व्यवस्थित बांधणे यामध्येच खूप आनंद मिळत होता.
मकरसंक्रांतिला १ दिवस अगोदर सर्वमित्र बाजारात जाऊन पतंग ची खरेदी करत होतो पतंगाला पण नाव होते गेंडा,चौकड्या,तिरंगी,डिग्गी,ढाबळ,मच्छी,
आणि माज्या नावे बललेरी,नवरंगी, कालीघन,लालघन,घोडा,चिराग,आता नवीन चयनिस आला.
नावेच ऐकलेच तर बरं वाटते पतंग उडवतांना तर आनंद कसा असेल बर?
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पहिलापतंग आभाळात उडवणे सर्वात उच्चीवर पतंग घालणे..मग कटम कट्टी लागली तर चक्रीची रील देऊन आपला पतंग पार होतो का दुसऱ्या व्यक्ती चा पार होतो तेच मन धक धक करायचं पतंग कटला तर पार पार ओरडायच...! खूपच वेगळंच आनंद होता तेव्हा.
पण आता ते चयनिस मांज्या आला तेव्हा पासून काय जास्त मज्जा राहिली नाही कारण पतंग आता पार होत नाही आणि माझी पतंग उडवण्याची आवड ही चयनिस माज्या येण्याआगोदरचा नाद होता.
पतंग किंवा संक्रात आली तर मला आज तेच दिवस आठवतात की लहानपणी आपण काय करत होतो आता आपण समजदार झालो तर जास्त नाही उडवत पतंग फक्त संक्रातीला गच्चीवर जाऊन बघतो आणि मित्रा सोबत डिजे बेस वर फक्त गाण्याचा आनंद घेत असतो पण खरंच लहानपणी एका गोष्टीचा नाद लागला तर ते काही बंद होत नव्हता मग आई बाबा काही म्हणो किंवा एक वेळा त्याचा मार खाओ पण आपण जे करायचं तेच करत होतो तरी बाबा म्हणत होते संक्रातीलाच तुला जेवढे पतंग उडवायचे ते उडव मी स्वतः घेऊन देतो पण रोज रोज इकडे तिकडे पळू नको पण काय थोडा वेळ हो म्हणत होतो आणि जे करायचं तेच करत होतो पुन्हा पतंग उडवत होतो.
लहानपणी मला पतंगउडवणे आणि क्रिकेट खेळणे खूपच जास्त वेड होत...
आता फक्त छतावर/गच्चीवर सर्वमित्र मिळून मकरसंक्रांतिचा १ दिवस फक्त आनंद घेत असतो.
हिंगोलीतील काही आगळा वेगळा संक्रातीला पतंग उडवला उसत्व व मला लहानपणी पतंग उडवण्याचा छंद होता म्हणून व्यक्त झालो.
टीप- चयनिस मांज्या नी पतंग उडवू नका....
तस थोडक्यात सांगायचे पर्यत केला तश राहील तर खूप काही सांगायच?

माझंमत माझेविचार #ट्विटरसंमेलन #ट्विटरकथा

Comments